Sunday, April 11, 2010

विनोदी अत्याचार

मागच्या आठवड्यात झालेल्या trip मधला उल्लेखणीय प्रकार म्हणजे प्रत्येकाने मारलेले PJs. हर एक member ने आपल्या सुपीक डोक्यातून असले एक से एक तीर सोडले आहेत ना !!!!

आठवत आहेत त्यातले एक-दोन नमुने (म्हणजे jokes चे नमुने),

प्रवेश पहिला :

प्रवासात रस्त्यात एक मोठी नदी लागली, गाडी पूल क्रॉस करत असताना,

सगळे : केव्हडी मोठी नदी आहे, केव्हडी सुंदर आहे वैगेरे वैगेरे
औसरकर (आपल्या डाव्या बाजूला बघून) : ये कोनसी नदी है ??
हितेन : अरे ये तो XYZ नदी है !!! (नाव आठवत नाहीये मला आत्ता)
औसरकर : अच्छा, (उजव्या बाजूला बघून) तो ये कोनसी नदी है ????
सगळे : हशा आणि टाळ्या, हितेन,  :-|


प्रवेश दुसरा :

औसरकर साहेब आपला घसा ताणून एक गाणे म्हणत होता (गात होता हे म्हणण्याची माझी तरी हिम्मत नाहीये)
मिटकर : अरे ह्याने तर गाण्याचे सूर-ताल-लय च बदलून टाकलेत !!!
सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या पण मात्र औसरकर अजून जोश मधे गाणे म्हणू लागला. बहुदा त्याच्या लक्षात नाही आले म्हणून मिटकर अजून एकदा हेच वाक्य म्हणाला, "अरे तू गाण्याचे सूर-ताल लssयच (खुपच) बदलून टाकलेत !!!"
परत सगळे : हशा आणि टाळ्या, औसरकर  :-(  आणि गप्प !!!!  (तात्पुरता)

प्रवेश तीसरा :

वॉशिंग्टन मधे फिरण्यासाठी आम्हाला खूप म्हणजे खुपच चालावे लागले. पायांचे अक्षरश तुकडे पडायची वेळ आली होती. म्हणून आम्ही एके ठिकाणी बसलो. सगळे प्रचंड थकलो होतो.
औसरकर : उद्या घरी गेलो की मी दिवसभर गरम पाण्यात पाय बुडवून ठेवणार आहे.
मी : अरे मीठाच्या गरम पाण्यात पाय बुडव (उगाच आपला सल्ला)
औसरकर : मीठाने काय होईल ??
मी (ह्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे ह्याची काहीच कल्पना नसल्याने) : पाय खारट होतील !!!!
औसरकर आणि मी ह्या उत्तरावर १५ मिनिट दात काढत बसलो, पण त्याने बराच शीण कमी झाला एव्हडे नक्की !!!

Saturday, February 20, 2010

फूल-टू-फिल्मी

आज सकाळ पासून फक्त एकच काम करतोय ....
 "उफ्फ तेरी अदा, I like the way you move!!!"
atleast ५० वेळा तरी ऐकले/पाहिले. video/audio दोन्ही आवडले.
(http://www.youtube.com/watch?v=7aWgvoCtvas)

मला एखादी गोष्ट परत परत बघायला खूप आवडते. काही काही गोष्टी तर इतक्या वेळा बघितल्या आहेत ना की अक्षरशः तोंड-पाठ आहेत. आणि काही परत परत पाहून आवडायला लागल्या. ह्या लिस्ट मधे टॉप वर अर्थात  'हिरो नं. १'. हा movie आम्ही इतक्या वेळा पाहिला आहे ना की मी तो न-बघता जसाच्या तसा लिहून काढू शकतो, त्यातल्या बारीक-सारीक  चुका सांगू शकतो !!!! २००० साली आम्ही घरी पहिल्यांदा color TV+CD player घेतला होता, त्या सोबत हा आणि 'अग्निपथ' च्या CDs घेऊन आलो. मग काय, दूरदर्शनला पहिल्यांदा आम्हाला पर्याय सापडला होता. जो पर्यंत भाड्याने एखादी movie आणली नाही (rent ने म्हणायचे आहे मला !!!) तो पर्यंत हेच २ movies परत परत बघत बसायचो.

ह्या नंतर मी एखादी गोष्ट परत परत पाहिली आहे तर ती आहे F.R.I.E.N.D.S.!!!! कधीच बोर नाही होणार राव. आता तरी मी random episodes बघतो पण जेव्हा सुरु केले होते तेव्हा तर म्हणजे पहिल्या episode पासून सुरु तर last episode पर्यंत सगळे क्रमात बघायचे आणि लगेच परत पुढचा round सुरु. असे किती iterations केले असतील त्याची गणतीच नाही.

काही मराठी नाटके, 'पती सगळे उचापती', 'मुक्कामपोस्ट बोंबीलवाडी', 'यदा-कदाचित'. ह्यातले dialogues तर सगळे नेहमीच्या बोलण्यात पण वापरतात.

किती चिक्कार वेळ आहे ना माझ्याकडे असल्या गोष्टी करण्यासाठी !!!
असो, आजचे पुराण बस झाले.

Sunday, February 14, 2010

मिले बे-सूर मेरा तुम्हारा

अरे काय चाललेय हे आजकाल, आत्ताच 'मिले सूर मेरा तुम्हारा' चा remake पाहिला .... कसला pathetic बनवला आहे !!!

original आणि remake मधे एकमेव common असलेल्या बच्चन साहेबांनी केलेली सुरवात बरी वाटली, शंकर-एहसान-लॉय पण ok होते, पण नंतर एक-एक नमुने जेव्हा स्क्रीनवर दिसायला लागले, तेव्हा मात्र डोकेच हलले. काय तो सलमान शर्ट न घालता येतो. दीपिका, प्रियंका, ऐश्वर्याचे एकूणच नकली हावभाव. वाया घालवलेला आमीर खान. शाहरुखची नेहमीची 'शाहरुख-गिरी'. आणि अशीच अजून काही नट-नट्यांची भरती. असे वाटत होते फराह खानच्या 'ओम शांती ओम' चा multi-starer video आहे.   अरेरे, बघवत नव्हते रे.

video मरू द्या, पण कमीत-कमी गाणे तरी चांगले बसवायला हवे होते, पण त्याची सुद्धा वाट लावली.

म्हणजे मी तर कसेतरी शेवट पर्यंत पाहिला आणि त्याचे माझ्यावर झालेले effects/घाव घालवण्यासाठी मला लगेच original वाले ऐकावे लागले. आहाहा, पंडित भीमसेन जोशींनी केलेली सुरवात म्हणजे खरच कानाला सुख आहे. बाकी गाण्याबद्दल काय बोलणार, मला नाही वाटत उभ्या भारतात असा कोणी असेल ज्याला ते गाणे आवडत नसेल. त्यात हत्ती वर बसलेला एक जण त्याची ओळ संपल्यानंतर जी मुंडी हलवतो ना, एक नंबर !!!!

खरच नका रे 'शोले', 'मिले सूर मेरा तुम्हारा', 'कर्ज' अश्या अजरामर गोष्टींना हात लाऊ.

असो, Happy Valentine's Day to all.

(Update: आत्ता आठवले, अमिताभ बच्चन बरोबरच original मधे उस्ताद झाकीर हुसेन पण होते)

Saturday, February 13, 2010

डांस धर्मेश डांस.

आज मी फक्त एका गोष्टी मुळे खूष आहे .... Dharmesh is Back !!!! And I am telling you guys, he will win 'Dance India Dance' this season. He is just AWESOME when he dances. त्याचे सगळेच्या-सगळे performances अफलातून आहेत, especially solo. मुख्य म्हणजे तो अजूनही तेव्हडाच जमीनीवर आहे. खरच तो जर रेमोच्या team मधे असला असता ना तर अजून 'सोने-पे-सुहागा' झाले असते यार.

मी त्याचे सगळे videos नाही इथे टाकत पण sample म्हणून त्याचा हा audition च्या वेळचा performace बघा. आणि जमले तर १३ फेब्रुवारीचा पण solo शोधून बघाच !!!
Dude, you rock ... respect !!!(Update: couldnt resist to add this video )


Wednesday, February 10, 2010

लिखाण

लिखाण कसे असावे? माहित नाही !!!
कशा बद्दल लिहावे?? माहित नाही !!!
किती लिहावे??  माहित नाही !!!

अलंकारित वाक्यरचना आपल्याला नाय जमत राव .... ह्या बद्दल एक किस्सा सांगतो, लोकमान्य टिळकांचा. त्यांचा पण same problem होता. त्यांची भाषा म्हणजे एकदम रोक-ठोक. एक घाव दोन तुकडे अश्या त्यांच्या खाक्या.
जेव्हा ते मंडाले तुरुंगातून सहा वर्षानंतर सुटले तेव्हा पोलिसांनी त्यांना पहाटे घरी सोडले. पूर्ण पुणेभर वणव्यासारखी बातमी पसरली. आल्या-आल्या टिळकांनी 'केसरी' चा कारभार हातात घेतला. धोंडोपंतांनी एक व्यवस्थित अग्रलेख लिहून टिळकांना नजेरेखालून घालण्यासाठी दिला. त्याचे शीर्षक होते 'लोकमान्य टिळक यांची बंधनमुक्तता' !!!

लोकमान्य उद्गारले, "बाकी मसुदा व्यवस्थित आहे, फक्त शीर्षक तेव्हडे बदला."
धोंडोपंत म्हणाले, "काय ठेवू?"
लोकमान्य म्हणाले, " 'टिळक सुटले !!!' "

कसे एकदम सुटसुटीत शीर्षक आहे ना, नंतर हेच शब्द महाराष्ट्रभर पसरले.
(संदर्भ: 'दुर्दम्य', गंगाधर गाडगीळ)


असो, ह्या सगळ्या मोठ्या-मोठ्या गोष्टी झाल्या. वाटले म्हणून लिहिले.
झोपतो आता.

Sunday, February 7, 2010

दादासाहेब फाळकेंची भट्टी (फॅक्टरी)

बरेच लोक movies चा review लिहितात, म्हटले आपण पण प्रयत्न करावा.

"हरिश्चंद्राची फॅक्टरी" पाहिला. एक नंबर आहे चित्रपट. ह्या movie बद्धल लिहिणे थोडे धाडसाचे पण सोपे काम आहे. कारण ह्या चित्रपटाबद्दल काही -ve points च नाहीयेत.

पहिली गोष्ट म्हणजे ह्याच दिग्दर्शकाचे "मुक्कामपोस्ट बोंबीलवाडी" नाटक तुषार, आशिष आणि माझ्या एकदम आवडीचे. तेव्हा माहित नव्हते की हा माणूस पुढे जाऊन इतका चांगला movie काढेल.

मला तर काही scene खुपच आवडले, e.g. जेव्हा त्यांचा एक त्रंबकेश्वारी मित्र एका scene च्या background मधे असलेल्या फणसाच्या झाडांबद्दल शंका विचारतो की, राजा हरीश्चान्द्राच्यावेळी फणसाची झाडे होती का? तर फाळके उत्तरतात की, कथानक महत्वाचे!!!!  हेच आपण प्रक्षकांना पण लागू होते की ह्या चित्रपटासाठी गोष्ट महत्वाची, बाकी बारीक-सारीक details नाहीत.
तसेच त्यावेळचा राजकारणातील मोठ-मोठ्या घडामोडी टाळून चित्रपटाचे कथानक साधे-सरळ आणि हलके-फुलके ठेवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न लाजवाब आहे. मला तर वेळो-वेळी "Life is Beautiful" ची आठवण येत होती.
त्या रामगोपाल वर्माला कोणीतरी सांगा की त्याच्या office ला "फॅक्टरी" म्हणाले म्हणजे तो दादासाहेब फाळके नाही होणार आहे (माहित नाही का पण मला आज-काल ह्या माणसाचा राग येत आहे).

अश्या प्रकारे १०० वर्षा पूर्वी एका नाशिकच्या माणसाने सुरु केलेली एक छोटीशी भट्टी आज आपल्याला Bollywood च्या रुपात दिसते आहे. माझ्या मते प्रत्येक चित्रपट-प्रेमीने हा movie बघावा.

माझ्या साठी तरी हा weekend सफल झाला.